एरंडोलच्या रील स्टारसोबत आधी शेतात पार्टी नंतर जेसीबी चालकाने दोरीने आवळला गळा

मयताच्या वडिलांनीच मुलाचा बंदोबस्त करण्याची गळ घातल्याने खून केल्याची संशयीताची कबुली


एरंडोल (2 फेब्रुवारी 2025) : एरंडोलच्या रील स्टारला आधी शेतात नेत त्याच्यासोबत पार्टी करण्यात आली व त्यानंतर संशयीत जेसीबी चालकाने त्याचा दोरीने गळा आवळून खून केला व नंतर मृताच्या वडिलांसह काका व पुतण्याला बोलावून त्याचा दफनविधी उरकण्यात आल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. संशयीत आरोपी तथा जेसीबी चालकानेच मयत विकीचा गळा दोरीने आवळल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

त्रासाला कंटाळलेल्या वडिलांच्या सांगण्यावरून झाली हत्या
रील्सस्टार विकी उर्फ हितेश पाटील हा दारू पिऊन आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करीत असल्यामुळे त्याचे वडील विठ्ठल पाटील यांनी जेसीबी चालक तथा संशयीत रवींद्र पाटील यास मुलाचा कायमचा बंदोबस्त करण्याचे सांगितले होते. जेसीबी चालक रवींद्र पाटील याने घटनेच्या दिवशी विकीसोबत शेतात पार्टी करीत त्यास दारू पाजली व विकी झोपल्यानंतर रवींद्र पाटील याने विकीचा दोरीने गळा आवळून खून केला. विकी मयत झाल्यानंतर त्याने वडील विठ्ठल पाटील यांना घटनेची माहिती कळवली.

त्यानंतर विठ्ठल पाटील यांनी त्यांचे भाऊ नामदेव सखाराम पाटील
यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. नामदेव पाटील यांचा मुलगा भालचंद्र नामदेव पाटील हा वडिलांना शेतात मोटरसायकलवर सोडण्यासाठी आआल्यानंतर जेसीबी चालक रवींद्र पाटील याने जेसीबी खड्डा खोदला व संशयीतांनी विकासी यास खड्ड्यात पुरले. त्यानंतर वडील विठ्ठल पाटील घरी आले व त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी मी मुलगा हितेश याचा खून
केला असून त्याचा मृतदेह भवरखेडा येथील एका कोरड्या तलावात पुरला असल्याचे लिहिले होते.

पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून हितेशचे काका, चुलत भाऊ, आणि जेसीबी चालक रवींद्र पाटील यांना अटक केली. माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांच्या मोठ्या मुलाने देखील दीड ते दोन वर्षांपूर्वी गळफास आत्महत्या केली होती. दरम्यान, मयत विकीच्या पश्चात पत्नी व केवळ चार ते पाच महिन्यांचा मुलगा आहे. संशयीत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व सहकारी करीत आहेत.


कॉपी करू नका.