वरणगावात टायर दुकानांसह सहा दुकान आगीच्या विळख्यात : 35 लाखांचे नुकसान


Six shops including tire shops gutted in fire in Varangaon: Loss of Rs 35 lakhs भुसावळ (2 मार्च 2025)  : भुसावळ तालुक्यातील बसस्थानक चौकातील टायर दुकानाला शनिवाीर दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागली. या घटनेत दुकानातील नवीन टायर व जुने टायर तसेच दुकानासमोर लावलेली स्कूटी व मोटरसायकल व शेजारील चार दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीत 35 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वरणगाव बसस्थानकाशेजारी लोककल्याण दवाखान्याला लागून मुस्लिम अन्सारी यांचे टायरचे दुकान आहे. या दुकानात शॉर्टसर्किटमुळे टायरला आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण करून दुकानासमोर उभ्या असलेल्या दोन्ही दुचाकींसह बाजूला असलेल्या खाद्यपदार्थ दुकानासह चार वाहन दुरुस्ती दुकानांना देखील आग लागली. मेडिकलला देखील आग लागून नुकसान झाले आहे. या आगीमध्ये जवळपास 35 लाखांच्या नुकसानीचा अंदाज असून, पंचनाम्यांचे काम उशिरापर्यंत सुरू होते. आयुध निर्माणीचे दोन अग्निशमन बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले मात्र, तोपर्यंत सर्व दुकानामधील साहित्य जळून नष्ट झाले.


कॉपी करू नका.