प्रवाशांनो लक्ष द्या : होळी निमित्ताने मध्य रेल्वेतून 48 अतिरिक्त विशेष गाड्यांची सुविधा
भुसावळ विभागातील प्रवाशांनाही घेता येईल लाभ
भुसावळ (2 मार्च 2025) : मध्य रेल्वेने होळीनिमित्त 48 अतिरिक्त विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथून महू, दानापूर, बनारस, समस्तीपूर, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम तसेच पुणे येथून गाजीपूर, दानापूर, हजरत निजामुद्दीन आदी स्थानकांपर्यंत या होळी विशेष गाड्या चालवल्या जातील.
अशा धावणार गाड्या
01009 लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस व 01010 द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन 11, 16 व 18 मार्चला सुटेल. 01123 लोकमान्य टिळक टर्मिनस-महू द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 7, 9, 14 व 16 मार्चला दुपारी 12.15 वाजता सुटेल. 01124 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन 9, 11, 16 व 18 मार्चला मऊ येथून सकाळी 5.50 वाजता सुटेल. 01053 लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 12 व 13 मार्चला सुटेल तर 01054 गाडी बनारस येथून 13 व 14 मार्चला रात्री 10.30 वाजता सुटेल. 01481 पुणे-दानापूर ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन 10, 14, 17 रोजी पुणे येथून सायंकाळी 7.55 वाजता सुटेल. 01482 दानापूर -पुणे ही द्वि-साप्ताहिक विशेष 12, 16 व 19 मार्चला दानापूर येथून सकाळी 6. 45 वाजता सुटेल. 01431 पुणे-गाजीपूर 7, 11, 14 व 18 मार्चला सकाळी 6.40 वाजता सुटेल तर 01432 गाजीपूर शहर-पुणे ही गाडी 9, 13, 16 व 20 मार्चला गाजीपुर येथून पहाटे 4.20 वाजता सुटणार आहे.

एलटीटी समस्तीपूर दरम्यान गाडी
01043 ही साप्ताहिक विशेष ट्रेन 11 व 18 मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 12.15 वाजता सुटेल तर 01044 ही साप्ताहिक विशेष ट्रेन 12, 19, रोजी समस्तीपूर येथून रात्री 11.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचेल. ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा या मार्गाने ही गाडी जाईल.






