भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा


भुसावळ (3 मार्च 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सायंटिफिक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. महाविद्यालयाच्या सायन्स असोसिएशन आणि सांस्कृतिक कार्यक्रम समितीने संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली.

स्पर्धेच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रगतीचे महत्व स्पष्ट करून जगाच्या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर विज्ञानातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास केला पाहिजे तसेच उपयोजित तंत्रज्ञानांचा अंगीकार केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.


प्रसंगी सायन्स असोसिएशनचे चेअरमन प्रा.डॉ.संजय देविदास चौधरी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय संकल्पनांना रांगोळीच्या माध्यमातून काढण्यासाठी प्रेरित केले. त्या नुसार सांस्कृतिक समितीच्या चेअरमन प्रा.श्रेया चौधरी यांच्या नियोजनानुसार विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सायन्सच्या विविध विषयांमधील संकल्पना रांगोळीच्या स्वरूपात काढल्या.

स्पर्धेनंतर रांगोळीचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. यासाठी महाविद्यालयात आलेल्या विद्यापीठाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष आणि सी.गो.पाटील महाविद्यालय, साक्री, जिल्हा धुळे येथील प्राचार्य, डॉ.पी.एस.सोनवणे यांच्याहस्ते रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.डॉ.विजय देसले, प्रा.डॉ.दिनेश माळी, जिजामाता महाविद्यालयातील भौत्ीकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एच.एम.पाटील आणि भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक उपस्थित होते.

रांगोळी स्पर्धेतील यांनी पटकावला क्रमांक
रांगोळी स्पर्धेत प्रथम- प्रिया येवले, द्वितीय गुलाम हुसेन खान तर वनस्पती शास्त्र विभागातील रांगोळ्यांसाठी प्रथम संजय साळुंखे व श्रद्धा सोनार, द्वितीय, रसायनशास्त्र, भौतीक शास्त्र, गणित, आणि संगणक शास्त्र यामधून प्रत्येकी मेघना पाठक, स्वराज तायडे, जान्हवी पिसाळकर आणि साक्षी कल्याणकर यांना विषयनिहाय प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. काजल सुनील जगताप हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रास्ताविक प्रा.संजय देविदास चौधरी तर आभार प्रा.डॉ.माधुरी पाटील तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा.संजय देविदास चौधरी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.दयाघन राणे, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण यांनी परिश्रम घेतल्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !