सोशल मीडियाचा वापर करताना सतर्कता गरजेची : सहा.निरीक्षक हरीदास बोचरे
रावेर (4 मार्च 2025) : एकविसाव्या शतकात बहुसंख्य तरुणांच्या हाती मोबाईल आला आहे. या मोबाईलमध्ये अनेक कार्यक्षेत्र असे आहेत की जे अनेकांना माहिती नसतात. फेसबुकसारख्या माध्यमातून त्यांना अनेक प्रकारांनी फसवले जाऊ शकते म्हणून त्यात असणार्या सुरक्षिततेचा उपयोग करून घेणे व त्याविषयीची माहिती करून घेणे आवश्यक आहे. अलीकडे सायबर गुन्हे वाढले असून सायबर जगात ज्या प्रकारचे गुन्हे होत आहेत. त्यापासून सतर्क राहणे सुरक्षित राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निंभोर्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे यांनी ऐनपूर येथे केले.
ऐनपूरला कार्यशाळा
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व युवा सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली. उद्घाटन डॉ.माधवी वाघोदे यांच्याहस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी बदलत्या काळात महिलांनी आणि युवकांनी बदलत्या आयामानुसार सक्षम होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कार्यशाळेत डॉ.माधवी वाघोदे यांनी ‘तरुण-तरुणींना आरोग्य सांभाळण्यासाठी घ्यावयाची काळजी’ या विषयावर दुसरे विचारपुष्प मांडले. व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेरच्या डॉ.नीता जाधव यांनी ‘युवक-युवतींच्या यशस्वी करिअर व रोजगार संधीसाठी शिक्षण व कौशल्य विकास ’ या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.रेखा पाटील यांनी तर आभार प्रा.डॉ.जे.पी. नेहेते यांनी मानले. उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.एन.वैष्णव, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा.एम.के.सोनवणे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.बाविस्कर, प्रा.नरेंद्र मुळे वगैरे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी हे कार्यशाळेसाठी उपस्थित होते.






