अहिरवाडी वनक्षेत्रात वनविभागाची कारवाई : 65 किलो डिंक, दोन मोटारसायकली जप्त


रावेर (5 मार्च 2025) : रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत भागातील अहिरवाडी व जुनोना खुर्द वनविभागाच्या कंपार्टमेंट मध्ये सुमारे वीस हजार रुपये किमतीचा 165 किलो डिंक जप्त केला याप्रकरणी डींक चोरी करणारे दोन मोटरसायकल सह मुद्देमाल सोडून पसार झाले.

रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अहिरवाडी येथील सेक्टर क्रमांक पाच मध्ये वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना मोटर सायकलवरून डिंक नेतांना अज्ञात इसम दुरुन दिसला. मोटरसायकल स्वारांचा पाठलाग केला असता ते पळून गेले.या कारवाईत दहा हजार 870 रुपये किमतीचा 98 किलो सलई डिंक तसेच (एम.एच.19 एजी 1723) ही पंधरा हजार रुपये किंमतीची मोटरसायकल तसेच सेक्टर क्रमांक आठमध्ये 47 किलो सलई पाच हजार 170 रुपये किंमत व जुनोने येथील सेक्टर क्रमांक सातमध्ये चार हजार रुपये किमतीचा 20 किलो धावडा डिंक तसेच (एम.पी.10 बीए 1469) ही मोटरसायकल असा 20 हजार 40 रुपये किंमतीचा 165 किलो डिंक व 53 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली असा 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल वन कर्मचार्‍यांनी जप्त केला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई वनक्षेत्रपाल अजय बावणे, वनपाल राजेंद्र सरदार (अहिरवाडी), वनरक्षक आयेशा पिंजारी (अहिरवाडी), सविता वाघ (पाडळे खुर्द), वनमजूर सुभाष माळी, इनुस तडवी, विनोद पाटील यांनी केली. मुद्देमाल रावेर येथील वन विभागाच्या आगारात जप्त करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !