साकळी शेत-शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय बालक ठार


Seven-year-old boy killed in leopard attack on Sakli farm यावल (7 मार्च 2025) : यावल तालुक्यातील किनगाव शेत शिवारातून मनवेल कडे जाणार्‍या जुन्या रस्त्यावर साकळी शेत-शिवारात आईसोबत एक 7 वर्षीय बालक हा घरी येत असताना अचानक बालकावर बिबट्याने हल्ला चढवला. आईने पूर्ण शक्तीनिशा बिबट्यापासून मुलास सोडवले मात्र या हल्ल्यात बालक ठार झाला. मयत बालकास आईने या घट्ट मिठी मारून पकडून ठेवत बिबट्याला पळवून लावले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या भागात दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह यावल रुग्णालयात आणण्यात आला आहे. या घटनेमुळे यावल तालुक्यातील पश्चिम भागात प्रचंड खळबळ उडाली आहे.बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा बळी घेतल्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे.


किनगाव, ता.यावल या गावातील शेतशिवारातून मनवेल गावाकडे जाणारा जुना रस्ता आहे. या रस्त्यावर साकळी शेत शिवारात केतन सुरेश जीवराम चौधरी यांच्या शेत आहे. या शेतात गुरूवारी दि.6 मार्च रोजी दुपारी सुनिता प्रेमा बारेला रा.किनगाव बुद्रुक ता.यावल मुळ रहिवासी खरगोन मध्यप्रदेश ही महिला काम करत होती. तेथे तिच्यासोबत तिचा सात वर्षीय मुलगा केशव बारेला हा देखील होता.

शेतीकाम आटोपल्यानंतर आई आणि मुलगा दोघे हे किनगाव गावात परत येत होते दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेत बांधावरून जात असताना बिबट्याने बालकावर हल्ला चढवला. आईच्या हात धरून चालत असलेल्या या बालकाला बिबट्याने हल्ला चढून ठार केले. महिलेने त्याचा विरोध केला आणि बिबट्याला तेथून पळून लावले. मात्र, तोवर बालक मयत झाला होता या घटनेची माहिती मिळताच शेतकर्‍यांनी वनविभागाला याची माहिती दिली.

घटनास्थळी यावल वन विभागाचे उप वनसरक्षंक जमीर शेख, सहाय्यक वनसरंक्षक प्रथमेश हाडपे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, माजी आमदार रमेश चौधरी, शेतकरी केतन सुरेश चौधरी, पोलीस पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून सदर मृतदेह यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. या घटनेमुळे किनगाव सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात देखील अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किनगाव तालुका यावल येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांचे मौजे साकळी, ता.यावल या शेती शिवारातील मालकी गट नं 472 यात कामास असलेले पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा केश्या पेमा बारेला याचेवर बिबट ने हल्ला केला. त्या हल्यात केश्या पेमा बारेला (7, किनगाव) हा मृत झाला. घटनास्थळी म. उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव जमीर शेख म. सहा. वनसंरक्षक चोपडा, यावल श्री. प्रथमेश हडपे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थ व शेतकरी यांचेशी चर्चा करून घ्यावायची काळजी बाबत मार्गदर्शन केले. तसेच वनकर्मचारी अधिकारी सूचना जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.

साकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय केशा प्रेमा बारेला या बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विधानसभा सभागृहात पॉइंट ऑफ इन्फोर्मेशनद्वारे शासनाचे लक्ष वेधले. मृत बालकाच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी सभागृहात केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !