जळगाव शहरात पुन्हा अपघात : ट्रकचा कट लागल्याने महिला जखमी


न्यूज नेटवर्क । जळगाव (8 मार्च 2025) : शहरातील राष्ट्रीय महामार्गाची मृत्यूची महामार्ग अशी ओळख बनतेय. बुधवारी रात्री शिवकॉलनीनजिक भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटनेला 24 तास उलटत नाही तोच गुरुवारी दुपारी आकाशवाणी चौकात ट्रकचा कट लागुन दुचाकीवरील महिला खाली चाकाखाली गंभीररित्या जखमी झाली. तिचा एक हात आणि एका पायाचा चेंदामेंदा झाला. रागिनी चंपालाल पाटील (वय 45) असे या महिलेचे नाव आहे. तिचे पती चंपालाल आनंदराव पाटील (वय 53 दोन्ही रा. साईनगर,भुसावळ) बालंबाल बचावले मात्र त्यांच्याही हातापायाला गंभीर इजा झाली.

अपघातानंतर या चौकात वाहतूक सेवा विस्कळीत
घटनेनंतर गंभीररित्या जखमी झालेली महिला बेशुध्दावस्थेत महामार्गावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेमधून दाम्पत्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. सहा डॉक्टरांच्या टीमने महिलेवर तातडीने उपचाराला करण्यास सुरुवात केली.


चंपालाल पाटील हे मुळ ऐनपूर येथील रहिवासी असून ते आर्मीतून निवृत्त झाले आहेत. ते ऑर्डिन्सस फॅक्टरीत सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी रागिनी पाटील यांची येथे हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट सुरू आहे. त्यांना सोबत घेऊन ते दुचाकी ( एमएच 19 डीपी 2467) ने भुसावळ येथुन जळगाव येथे हॉस्पिटलमध्ये जात होते. आकाशवाणी चौक क्रॉस करत असताना लोखंडी एन्गल भरलेला ट्रक ( सीजी 04 एलडब्ल्यू 1239) भुसावळकडून आकाशवाणी चौक क्रॉस करत होता. त्याचवेळी ट्रकचा कट लागल्याने रागिनी पाटील या दुचाकीवरुन खाली पडल्या आणि ट्रकखाली सापडल्या. व रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्दावस्थेत पडल्या. ही घटना कळताच पाटील यांच्या स्नेहीजणांसह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.जखमी महिलेस पाहताच नातेवाईक महिलांना रडू कोसळले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !