धडगावात सहा लाख 24 हजारांची अवैध दारू झोपडीतून जप्त

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ः पोलीस येताच संशयीत पसार


Illegal liquor worth Rs 6.24 lakh seized from a hut in Dhadgaon धडगाव (8 मार्च 2025) : धडगाव येथे एका झोपडीत अवैधरित्या मद्याचा साठा करण्यात आल्याची माहिती नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर पथकाने छापेमारी करीत सहा लाख 24 हजारांचा दारू साठा जप्त करण्यात आला. पोलीस येताच संशयीत पसार झाले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना धडगाव येथील खुंटामोडीचा पितीपाडा येथे रस्त्याच्या कडेला एका झोपडीत मद्यसाठा उतरवण्यात आल्याची माहिती मिळाली होती व संशयीत चोरट्या पद्धत्तीने मद्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. पोलीस पथकाने 7 रोजी छापेमारी केली. यावेळी दोघा संशयीतांना ओळखण्यात आले मात्र पोलीस येताच ते पसार झाले.




सहा संशयीतांविरोधात गुन्हा
पोलिसांनी याप्रकरणी राहुल मानसिंग तडवी (रा.भगदरी), उमेदसिंग गोविंदसिंग पाडवी (काठीचा निंबीपाडा), लक्ष्मण विक्रम पाडवी (काठी, ता.)अक्कलकुवा), शिवदास ऊर्फ भाया कुवरसिंग पाडवी (रोझवा, ता.तळोदा), वसंत किरमा वळवी (खुंटामोडीचा पितीपाडा, ता.धडगाव), नागेश दमण्या वळवी (कात्री, ता.धडगाव) यांच्याविरोधात धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस., अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, दीपक न्हावी, अभिमन्यू गावीत व धडगाव पोलिसांनी केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !