अज्ञात वाहनाच्या धडकेने निंभोर्यातील तरुण ठार
Youth from Nimbhoria killed after being hit by unknown vehicle निंभोरा (9 मार्च 2025) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने निंभोरा गावातील कपिल अशोक वारके (33) यांचा मृत्यू झाला. वारके हे सावद्याहून निंभोरा येथे परत येत असताना वाघोदा येथील श्री शनी मंदिराजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातानंतर अज्ञात वाहन धारक पसार झाला.
मृतदेह रावेर येथे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गर्जे व सहकारी करीत आहेत. दरम्यान मयत कपिल वारके यांचा मेडिकल व्यवसाय असून गावातील प्रत्येक चांगल्या कार्यात भाग घेणारे असल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आले. कपिल हे निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक ए.एच.वारके यांचे मोठे चिरंजीव आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.





