भीषण अपघातात चार मजूर जागीच ठार
Four laborers killed on the spot in a horrific accident कन्नड (10 मार्च 2025) उसाचा ट्रक उलटल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत चार मजुरांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड पिशोर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नागरिकांनी जखमी मजूरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड-पिशोर मार्गावर रात्री 12 वाजेच्या सुमारास एका उसाच्या ट्रकवर बसून 17 मजूर प्रवास करत होते. हा ट्रक अचानक उलटल्याने 17 मजूर उसाखाली दबले. स्थानिकांना अपघाताची माहिती मिळाल्याने त्यांनी बचाववासाठी धाव घेतली. यात 13 जणांना वाचिवण्यात यश आले. मात्र दुर्दैवाने चार जणांचा मृत्यू झाला. तर जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. नेमका अपघात कसा झाला याबद्दल पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.





