मंगरूळातील दुचाकी चोरटा रावेर पोलिसांच्या जाळ्यात
Mangrula bike thief caught by Raver police रावेर (10 मार्च 2025) रावेर पोलिसांनी मंगरूळ येथील दुचाकी चोरट्याला अटक करीत पाल येथून चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे. कालू बादशाह बिलाला (18, मंगरूळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर तालुक्यातील पाल येथील मुख्य रस्त्यावरून हिरो होंडा कंपनीची महागडी युनिकॉन चोरट्यांने चोरुन नेली होती. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. रावेर पोलिसांना संशयीत कालू बादशाह बिलाला याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी चोरीची दुचाकी काढून दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर
अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सोनू तडवी, महेश मोगरे, अतुल गाडी लोहार आदींच्या पथकाने केली.




