नशिराबादला गुन्हे शाखेची कारवाई : अवैध रिफिलिंग करताना 13 गॅस सिलेंडर जप्त


Crime Branch action in Nashirabad : 13 gas cylinders seized while illegally refilling नशिराबाद (10 मार्च 2025) : अवैधरित्या गॅस रिफीलींग सुरू असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत 13 भरलेले व पाच रिकामे सिलींडर जप्त केले. याप्रकरणी आफताब आलम शेख रहीम (28, रा.रहमतपूर नशिराबाद, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुुमारास करण्यात आली.

यांनी केली कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाळ गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ यांचे पथक रात्रीच्या गस्तीवर होते. गस्त करीत असतांना त्यांना नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या घरगुती गॅस सिलिंडर मधून प्रवासी रिक्षा गॅस रिफिलिंग करतांना दिसले. यावेळी रिक्षा चालकास संशय आल्याने तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यानंतर पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता आफताब आलम शेख रहीम हा वाहनात गॅस भरतांना मिळून आला.


मालवाहतूक वाहनासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त
पथकाने संशयिताला ताब्यात घेतले असता, त्याच्याजवळ असलेली मालवाहतूक वाहन व त्यामध्ये ठेवलेले तेरा भरलेले गॅस सिलेंडर, पाच रिकामे यासह गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण तीन लाख 96 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !