आता एस.टी.प्रवासही असुरक्षित ! : धरणगावच्या महिलेचे तीन लाख 60 हजारांचे दागिने लांबवले
अमळनेर (10 मार्च 2025) : जळगाव-दोंडाईचा बस प्रवासात महिलेच्या पर्समधून तीन लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. हा प्रकार गुरुवार, 6 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता अमळनेर शहरातील पैलाड चौकात उघडकीस आला. याप्रकरणी शनिवार, 8 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके ?
प्रतिभा जिजाबराव पाटील (48, रा.गारखेडा, ता.धरणगाव) या 6 मार्च रोजी जळगाव ते दोंडाईचा बसमधून प्रवास करत होत्या. त्यांच्या पर्समध्ये तीन लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवले होते. बस अमळनेर शहरातील पैलाड चौकातून जात असताना त्यांच्या लक्षात आले की, पर्समधील दागिने चोरीला गेले आहेत. त्यांनी तत्काळ अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत





