पाकिस्तानातून अख्खी ट्रेनच हायजॅक : चकमकीत सहा जवान शहीद


Entire train hijacked from Pakistan: Six soldiers martyred in encounter नवी दिल्ली (11 मार्च 2025) : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये शेकडो प्रवाशांनी भरलेली जाफर एक्स्प्रेस हायजॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर ट्रेन हायटॅखची माहिती दिली असून आतापर्यंतच्या चकमकीत सहा जवान शहीद झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वामधील पेशावरकडे जाफर एक्सप्रेस जात असताना ही घटना घडली. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला तर सर्व ओलीसांना ठार मारू आणि या मृत्यूची जबाबदारी संपूर्णपणे लष्करावर राहील, अशी धमकीही देण्यात आली.

ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे सक्रिय कर्तव्य कर्मचारी देखील आहेत. हे सर्व सुट्टीवर पंजाबला जात होते.

बलुच लिबरेशन आर्मीने सांगितले की, हे ऑपरेशन मजीद ब्रिगेड, एसटीओएस आणि फतेह पथकाने संयुक्तपणे केले आहे. आतापर्यंत सहा जवान शहीद झाले असून, शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. बीएलएचे प्रवक्ते जिआंद बलोच याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


कॉपी करू नका.