15 हजारांचा मोह नडला : सटाणा मंडळाधिकार्‍यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात


15 thousand was not enough: Talathi along with Satana Mandal officer in the net of ACB सटाणा (11 मार्च 2025) : सातबारा उतार्‍यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची मागणी करून 15 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवणार्‍या सटाणा, जिल्हा येथील मंडळाधिकारी संजय गंगाधर साळी व ठेंगोडा तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव यांना नाशिक एसीबीने अटक केली.

असे आहे लाच प्रकरण
43 वर्षीय तक्रारदार हे मौजे दर्‍हाणे, ता.सटाणा येथील रहिवासी असून तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव, मंडळाधिकारी संजय साळी यांनी तक्रारदाराच्या मुलाने खरेदी केलेल्या शेतीस त्याचे शेतीच्या सातबारा उतार्‍यावर त्याचे नाव लावण्याचे मोबदल्यात त्यांच्याकडे
25 हजारांची लाच मागितली. 16 डिसेंबर रोजी लाच मागणी करण्यात आल्यानंतर तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली मात्र आरोपींना संशय आल्यानंतर त्यांनी लाच घेतली नाही.

लाच मागणीचा अहवाल येताच मंगळवारी सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, हवालदार दीपक पवार, प्रभाकर गवळी, पोलीस शिपाई संजय ठाकरे, चालक विनोद पवार, परशुराम जाधव आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.