जळगावात बसमध्ये चढताना भामट्याने महिलेची पोत लांबवली


जळगाव (12 मार्च 2025) : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत भामट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पलायन केले. ही घटना सोमवारी दुपारी 4.20 वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौक उपाध्ये लॉजसमोर घडली.

जयवंताबाई सदाशिव कोळी (70, रा.सांगवी खुर्द, ता.यावल) तसेच त्यांचे पती रघुनाथ कोळी असे जळगाव येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यानंतर ते परतीच्या प्रवासासाठी टॉवर चौकात शिवाजीनगरकडे जाणार्‍या मार्गावर बस स्टॉपजवळ बसच्या प्रतीक्षेत थांबले होते. बस थांबल्यानंतर दाम्पत्य दरवाजातून बसमध्ये चढत असताना भामट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे 40 हजार किमतीची सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मणी, दोन ग्रॅम वजनाचे डोरले व काळे मणी अशी पोत गळ्यातून तोडली. महिलेच्या लक्षात येताच आरडाओरड केली, तोवर गर्दीतून भामटा पसार झाला होता. माहिती कळताच पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे पोलिसांसह घटनास्थळी रवाना झाले व माहिती जाणून घेतली.

या प्रकरणी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार उमेश भांडारकर हे तपास करीत आहेत.


कॉपी करू नका.