साडेचार हजारांची लाच भोवली : चोपडा वीज कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला एसीबीकडून कारवाईचा ‘शॉक’


Bribe worth Rs 4.500 taken: Chopra Power Company engineer ‘shocked’ by ACB’s action चोपडा (12 मार्च 2025) : नवीन विद्युत मीटर बसवून देण्यासाठी साडेचार हजारांची लाच मागून ती कार्यालयातच स्वीकारणार्‍या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील चोपडा शहर कक्षातील सहाय्यक अभियंत्यास जळगाव एसीबीने अटक केली आहे. अमित दिलीप सुलक्षणे (35, रा.प्लॉट.नं.60, बोरोले एक, चोपडा) असे अटकेतील अधिकार्‍याचे नाव आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
23 वर्षीय तक्रारदाराकडे नवीन वीज मिटर बसवून देण्याकरीता सहा.अभियंता अमित सुलक्षणे याने मंगळवार, 11 मार्च रोजी साडेपाच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने साडेचार हजार रुपये देण्याचे ठरवत एसीबीकडे तक्रार नोंदवली व त्यानंतर लाच पडताळणी करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी सायंकाळी सुलक्षणे याने कार्यालयातच लाच स्वीकारल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. चोपडा शहर पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव. ळगाव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, प्रणेश ठाकूर, मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.