आत्मविश्वास असलेली प्रत्येक महिला सुंदरच : समुपदेशक आरती चौधरी
भुसावळ शहरात मेक अप स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Every confident woman is beautiful : Counselor Aarti Chaudhary भुसावळ (12 मार्च 2025) महिला या मुळातच सृजनशील असतात व कमीत कमी साहित्यातून चांगलं कसं करता येईल याचे महिलांना उपजतच ज्ञान असते त्यामुळे मेकअप स्पर्धेतून हेच साध्य करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. आत्मविश्वास असलेली प्रत्येक महिला सुंदरच दिसते, असे मत भुसावळातील समुपदेशक आरती चौधरी यांनी व्यक्त केले. शहरातील महिला क्रीडा मंडळातर्फे महिलांसाठी नववधू मेकअप स्पर्धा शहरातील ब्राह्मण संघात सोमवारी घेण्यात आली. शहरातील 40 ब्युटी पार्लरच्या संचालिका व 40 मॉडेल सहभागी झाल्या.
यांची होती उपस्थिती
परीक्षणानंतर विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वर्षा कोळंबे अतिथी होत्या. यावेळी गुरे चराई व शेती काम करून कुटूंबाला हातभार लावणार्या इंदुबाई कोळी निराधार महिलेचा प्रतीकात्मक सत्कार करून महिला दिन साजरा करण्यात आला. सचिव लता होसकोटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परीचय किरण चौधरी यांनी दिला. परीक्षक म्हणून ब्युटीशियन माया पवार उपस्थित होत्या. त्यांची ओळख प्रो.चेअरमन चारु महाजन यांनी दिली.
यांची होती उपस्थिती
सूत्रसंचलन उपाध्यक्ष स्वाती नाईक यांनी तर आभार विनीता नेवे यांनी मानले. याप्रसंगी महिला क्रीडा मंडळाच्या सचिव लता होसकोटे, स्वाती नाईक, किरण चौधरी, चारू महाजन, प्रिता पिंगळे, विनीता नेवे, माधुरी गव्हाळे, अनिता सपकाळे, अनिता कवडीवाले, भारती चव्हाण, प्रभाताई पाटील, रश्मी ठोसर सुनीता पाचपांडे मंगला पाटील, संगीता पाटील, वैशाली पाटील उपस्थित होत्या.
असे आहे स्पर्धेतील विजेते
प्रथम- रश्मी पाटील, द्वितीय- काजल भंगाळे, तृतीय- कावेरी जाधव, बेस्ट आय मेकअप- छाया पाटील, बेस्ट कॉस्च्युम- प्रेरणा खडसे, बेस्ट ज्वेलरी प्रिया कोळी, हेअरस्टाईल- चैताली पाटील, नॅचरल मेकअप- वर्षा निकम, ट्रेडीशनल लूक- पूनम कोळी, पर्सनॅलिटी- प्रिया तायडे.


