भुसावळातील ललवानी फाउंडेशनतर्फे जैन धर्मीय तपस्वींचा सन्मान

भुसावळ (12 मार्च 2025) शहरातील ललवाणी फाउंडेशनतर्फे महिला दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त जैन धर्मीय तप करणार्या महिलांचा उचित सन्मान व सत्कार करण्यात आला. ललवाणी फार्म हाऊसवर स्वागत करून निमंत्रीत महिलांनी अध्यात्मिक, धार्मिक, भक्ती संगीताचा आनंद घेतला. सुशील बहु मंडळाच्या सर्व सदस्यांनी भक्ती गीत, भावगीत सादर केले. ललवाणी परिवारातील वर्षा ललवाणी यांनी सांझी गीत सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन मंगला प्रकाश कोटेचा यांनी केले.
सुशील बहु मंडळाच्या अध्यक्षा संगीता मुगदिया यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन वर्षीतप करणार्या महिलांचा सन्मान केला. ललवाणी परिवाराच्या वतीने ज्योती ललवाणी व शोभा ललवाणी यांनी सत्कार केला. ललवाणी परिवाराच्या आप्त पुष्पाजी कर्णावट, पद्मा रमेश ललवाणी तसेच भुसावळच्या संगीता कुंदन कोटेचा व रश्मी मुकेश चोपडा या चारही महिला जैन धर्मिया कठीण अशी साधना म्हणजे वर्षीतप करीत आहे. त्याचप्रमाणे सर्व महिलांनी या दिवशी ललवाणी अॅग्रो टुरिझमचा व ललवाणी फार्ममध्ये येथेच्छ निसर्गाचा आनंद लुटला. त्याचप्रमाणे स्व.स्वप्नील स्मृती गोकुल ग्रामला सुद्धा भेट देऊन गोमातेची सेवा केली. तेथे सुद्धा महिलांनी खेळण्याचा आनंद घेतला. ललवाणी हिल्सला सुध्दा भेट देवून फळ बागायतीची माहिती घेण्यात आली.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, जेष्ठ सुश्रावक प्रेम कोटेचा, सुनील कोटेचा, हेमंत मंडलेचा, गादीया बंधू, अतुल ताथेड, ललवाणी परिवारांचे अर्ध्वयु मदनलाल ललवानी, डहाणूचे सुरेंद्रजी कर्नावट, पहुरचे प्रफुल्ल लोढा, जामनेरचे प्रमोद बोरा, मुंबईचे उद्योजक अंकुश रुणवाल, सी.ए.हर्ष संघवी, जयेश ललवाणी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
पारस नाहाटा, वीणा कोटेचा, संगीता मंडलेचा, ज्योती गादिया, सुशीला कुंमट, निर्मला सुराणा, राणी जैन, अंजली ताथेड, रीटा छेडा, मीना चोरडिया, किरण कोटेचा, रुपाली कांठेड, मृणाली रुणवाल, कल्पना नहार, प्रीती संचेती, रंजना हेडा, तेजस्विनी चोपडा, किर्ती कोटेचा, रुपाली गादिया, अनिता साखला, दीपा गादिया, डिंपल कोटेचा, गायत्री मंडलेचा, सपना नाहाटा, राधा शर्मा, पूजा गादिया, निलम गोधा, सुरभी कटारीया, खुशबू ललवाणी, उषा सुराणा, सपना ललवाणी आदी अनेक महिला उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी सुयश ललवाणी, नलीन ललवाणी, संदीप गायकवाड, महेश जगताप, सखाराम पावरा, आदेश ललवाणी, प्रशांत कोटेचा, गायत्री जगताप, केशनी गायकवाड, सुखदेव पवार, अनंत जगताप, राजु बडगुजर, गजानन पाटील आदींनी परिश्रम घेतले.आभार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांनी मानले.


