जुन्या भांडणावरून चुलत भावांना अश्लिल शिवीगाळ


जळगाव (13 मार्च 2025) : जुन्या भांडणाच्या कारणावरून जळगाव तालुक्यातील आव्हाना शिवारात दुचाकीवरून जाणार्‍या दोन चुलत भावांना रस्त्यावर अडवून अश्लिल शिवीगाळ करत धारदार सुरा पोटात खुपसण्याची धमकी देण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली आहे. याप्रकरणी रजळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव दिनकर चौधरी (52, रा.आव्हाणा) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार, 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता नामदेव चौधरी हे त्यांचे चुलत भाऊ मनोहर रूपसिंग चौधरी यांच्यासोबत त्यांच्या दुचाकीने शेतात जात असताना जवळ संशयित आरोपी नितीन उर्फ पपई जगन पाटील (आव्हाणा) याने त्यांचा रस्ता अडविला आणि जुन्या वादातून अश्लील शिवीगाळ केली तसेच लोखंडी सुरा पोटात खुपसण्याची धमकी देखील दिली. या घटनेबाबत नामदेव चौधरी यांनी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी नितीन उर्फ पपई जगन पाटील (रा.आव्हाणा, ता.जळगाव) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल धनराज पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.