शिंदखेडा तालुक्यात भीषण अपघात : ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील माय-लेकींचा मृत्यू


Terrible accident in Shindkheda taluka : Mother and daughter on a two-wheeler die after being hit by a truck शिंदखेडा (13 मार्च 2025) : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने विवाहितेसह तिची सात महिन्यांची मुलगी ठार झाला. हा अपघात शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. बबलीबाई संतोषनाथ भाटी (29), मुलगी तनया (7 महिने) ठार झाली तर विवाहितेचा पती जखमी झाला. अपघात प्रकरणी आयशर चालकाविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भरधाव आयशरच्या धडकेने अपघात
मुंबई-आग्रा महामार्गाला लागून असलेल्या बाभळे फाट्याजवळ भरधाव आयशर (एम.एच.12 यु.एम.0500) ने दुचाकी (एम.पी.49 एनई 4099)ला जोरदार धडक दिली. या अपघातात संतोषनाथ बाबूनाथ भाटी (23) हे जखमी झाले तर त्यांच्या पत्नी बबलीबाई वा सात महिन्यांची मुलगी तनया ठार झाली. संतोषनाथ यांच्या तक्रारीवरून आयशर चालक पोपट आप्पा भाटकर (45, रा.बारामती, जि.पुणे) विरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.