लाच प्रकरण : चोपड्यातील लाचखोर सहाय्यक अभियंत्यांची पोलीस कोठडीत रवानगी


Bribery case : Assistant engineers involved in bribery in Chopda remanded in police custody भुसावळ (13 मार्च 2025) : नवीन विद्युत मीटर बसवून देण्यासाठी साडेचार हजारांची लाच मागून ती कार्यालयातच स्वीकारणार्‍या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील चोपडा शहर कक्षातील सहाय्यक अभियंता अमित दिलीप सुलक्षणे (35, रा.प्लॉट.नं.60, बोरोले एक, चोपडा) यास बुधवारी सायंकाळी एसीबीने अटक केली होती. संशयीताला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
23 वर्षीय तक्रारदाराकडे नवीन वीज मिटर बसवून देण्याकरीता सहा.अभियंता अमित सुलक्षणे याने मंगळवार, 11 मार्च रोजी साडेपाच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने साडेचार हजार रुपये देण्याचे ठरवत एसीबीकडे तक्रार नोंदवली व त्यानंतर लाच पडताळणी करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी सायंकाळी सुलक्षणे याने कार्यालयातच लाच स्वीकारल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत.


कॉपी करू नका.