तरुणाच्या खुनाने नाशिक हादरले : चॉपरचे वार करीत तरुणाची हत्या


नाशिक (14 मार्च2025)  चॉपरने सपासप वार करीत तरुणाची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोच्या शुभम पार्क भागातील चर्चसमोरील मुख्य वर्दळीचा रस्त्यालगत गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सुमित देवरे (28, रा.महाजननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सिडको परिसरात जागोजागी होळी पेटवून महिलांकडून पुजाविधी केला जात असताना अचानकपणे केवल पार्क भागात रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही खुनाची घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा अंबड पोलिस ठाणे हद्दीतील सिडकोमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्य या खुनाच्या घटनेने परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने देवरेचा काटा काढल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक राकेश हांडे यांचे पथकासह गुन्हे शाखा युनिट-1चे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह व युनिट-2 चे पथक तसेच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

तातडीने गंभीर जखमी सुमीतला पोलिस वाहनातून शासकिय जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र वैद्यकिय अधिकारी यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.


कॉपी करू नका.