मंत्री गिरीश महाजनांचा टोला : विरोधकांनी आता पाच वर्ष आराम करावा !

Minister Girish Mahajan’s taunt : The opposition should now rest for five years! जामनेर (15 मार्च 2025) : जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मंत्री एकनाथरााव खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सख्य राज्याला ठावू आहे. त्यातच धूळवडच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात विरोधक शिल्लक राहिलेले नाहीत. जे शिल्लक राहिले आहेत त्यांनी पाच वर्षे आराम करावा, असा टोला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना लगावला आहे.
खडसेंच्या आरोपात तथ्य नाही
भाजपा महिला पदाधिकार्याच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी पोलीस आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. मात्र आरोपींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, हेच आमचे पहिल्यापासून मत आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कोणाला वाचवले जात आहे, या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
धूलिवंदनाच्या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा देखील सल्ला दिला. सर्व तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर तरुणांनी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात सध्या विरोधक शिल्लक नाहीत. जे थोडेफार शिल्लक आहेत, त्यांनी पाच वर्षे आता आराम करावा. त्यांच्याकडे काही चांगल्या सूचना असल्यास त्यांनी त्या सरकारला सुचवाव्यात, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला.


