यावल शहरातील जल कुंभावरील वॉचमनला चौघांकडून मारहाण


यावल (15 मार्च2025) : शहरातील विस्तारित भागात तडवी कॉलनी मध्ये जल कुंभावरील 24 वर्षीय कंत्राटी वॉचमलनला चौघांनी दगड मारून दुखापत केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. या दगडाने जलकुंबावरील मधमाशांचे आग्या मोहोळ उठले व त्यांनीदेखील या तरुणावर हल्ला केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
शहरातील फैजपूर रस्त्यालगत विस्तारित भागात तडवी कॉलनीत नगरपालिकेचे जल कुंभ आहे. या जलकुंभावर नगरपालिकेकडून कंत्राटी वॉचमन म्हणून हर्षल राजू पवार (24) या तरुणाची नियुक्ती केली आहे. हा तरुण बुधवारी रात्री तिथे कामावर असतांना या भागातील रहिवाशी अब्बास पटेल व त्याच्यासोबत असलेले तीन अनोळखी अशा चार जणांनी त्याला कारण नसताना शिविगाळ केली आणि तिच्या दिशेने दगडफेक करून त्याला दुखापत केली. या दगडात त्याच्या छातीवर आणि पाठीवर लागून दुखापत झाली तर या दगडफेकीत पाण्याच्या टाकीवर असलेले मधमाश्यांचे आग्या मोहोळ देखील दगड लागल्यामुळे उठले आणि त्या मधमाशांनी देखील त्याच्यावर हल्ला चढवला यात तो जखमी झाला आहे.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


कॉपी करू नका.