भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात खेलो होली इको फ्रेंडली सण उत्सवात


भुसावळ (15 मार्च 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘खेलो होली इको फ्रेंडली’ सण उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे विज्ञान शिक्षक एस.एस.कापसे यांनी होळीच्या सणाचे महत्व व सध्या आपण खेळत असलेल्या रासायनिक रंगांच्या दुष्परिणामांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. रासायनिक रंगात असणार्‍या रासायनिक घटकांमुळे आपली त्वचा डोळे व संपूर्ण आरोग्यावर कसा दुष्परिणाम होतो शिवाय दरवर्षी अनेकांना रासायनिक रंगाची बाधा होते.

रासायनिक रंगात असणार्‍या ऑक्साईडमुळे मूत्रपिंडात बिघाड होतो शिवाय कॅन्सर सारखा भयानक आजार यामुळे होऊ शकतो म्हणून आपण नैसर्गिक रंगाचा वापर करणे आवश्यक असल्याचे कापसे म्हणाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे व पर्यवेक्षिका एस.ए.अडकमोल यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग निर्मिती करूनच रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले. संगीत शिक्षक डी.एम.हेलोडे यांनी नैसर्गिक रंग कसे बनवावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यशस्वीतेसाठी कलाशिक्षक एम.व्ही.गरुडे, एस.पी.पाठक तसेच इयत्ता नववीतील सम्यक इखारे, मनीष मावळे, मधुश्री बर्‍हाटे या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.


कॉपी करू नका.