भुसावळात निळे निशाण संघटनेत अनेकांचा प्रवेश


भुसावळ (15 मार्च 2025) : शहरातील शासकीय विश्रामगृहात गुरुवार, 13 रोजी निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगाव जिल्हाध्यक्षा नंदा भावटे यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण इंगळे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली.

यावेळी भुसावळ नगरपालिका रुग्णालयाच्या मनमानी कारभारासंदर्भात तसेच सर्व सामान्य जनतेच्या मुलभुत समस्यांविषयीचर्चा करण्यात आली.आंदोलनात्मक भूमिकेतून समस्या सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अ‍ॅड.प्रिया अडकमोल, अ‍ॅड.क्रिष्णा उर्फ उषा सिंग, अ‍ॅड.उमेश पानपाटील, सागर गजभिये यांनी संघटनेत प्रवेश केला. शिक्षण व रोजगार समिती जिल्हाध्यक्ष निकिता भावटे, भुसावळ तालुकाध्यक्ष निर्मला सुरवाडे, विभागीय अध्यक्ष लक्ष्मी मेढे, विलास तायडे, मनिषा लोखंडे, मंदा साळवे यांनी संघटनेत प्रवेश करणार्‍यांचे स्वागत केले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !