भुसावळातील 11 वर्षीय बालकाचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू


11-year-old boy from Bhusawal dies after drowning in a river भुसावळ (16 मार्च2025) : रंगपंचमीच्या सणानंतर अंघोळीसाठी नदीपात्रात गेलेल्या शहराजवळील साकरी फाटा भागातील 11 वर्षीय अल्पवयीन बालकाचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भुसावळ शहर हद्दीतील आरपीडीजवळ नदीपात्रात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राजरत्न भिका निकम (11, साकरी फाटा, पेट्रोल पंपाजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

पाण्याचा अंदाज न बुडाल्याने बालक बुडाला
राजरत्नसह सोबतचे चार मित्र धुळवडीनंतर अंघोळ करण्यासाठी आरपीडीमागील नदीपात्रातील डोहात अंघोळीसाठी गेले मात्र डोहाचा अंदाज न आल्याने बालकाचा बुडून मृत्यू झाला. सोबतच्या मित्रांनी ही घटना कुटूंबाला कळवल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. भुसावळातील ट्राम केअर सेंटरमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेनंतर साकरी फाटा परिसरात शोककळा पसरली.


कॉपी करू नका.