यावल तालुका हादरला : चाकूचा धाक दाखवत सुनेवर सासर्‍याचा अत्याचार


यावल (16 मार्च 2025) : यावल तालुक्यातील एका गावात सासरा-सुनेच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. सासर्‍यानेच सुनेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली. गेल्या सहा महिन्यांपासून सासरा सुनेला मारहाण करीत अत्याचार करीत होता. यातचं तिला त्याने मारहाण करीत दुखापतदेखील केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सुनेच्या फिर्यादीवरून 56 वर्षीय सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
दहिगाव गावात एका भागात 56 वर्षीय इसम आपल्या सुनेसह राहतो. या इसमाने ऑगस्ट 2024 च्या रात्री तिच्या सुनेला चाकूचा धाक दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक अत्याचार केला. तेव्हापासून सतत 31 जानेवारी 2025 दरम्यान त्याचे हे कृत्य सुरूच होते. विवाहिता त्याच्या या अत्याचाराला कंटाळली होती. आरोपीने विवाहितेवर लैंगिक अत्याचारासह तिला जबर मारहाण देखील केली आणि दुखापत केली. विवाहितेने यानंतर माहेर गाठत संपूर्ण प्रकार आपल्या माहेरी सांगितल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.


कॉपी करू नका.
WhatsApp Group