बेलसवाडी घटनेचा निषेध : मुक्ताईनगर बंदला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताईनगर (16 मार्च 2025) : मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गोवंशाच्या वासरावर शनिवार, 15 मार्च रोजी अल्पवयीनाने अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर सकल हिंदू समाज बांधवांकडून पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व व्यापार्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. दरम्यान, अल्पवयीनावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्यास रिमांड होममध्ये दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अल्पवयीनावर तातडीने कारवाई
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गोठ्यात बांधलेल्या गोवंशाच्या वासरावर शनिवार, 15 मार्च रोजी अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेने परिसरासह सर्वत्र मोठी खळबळ उडाली व या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. मुक्ताईनगर पोलिसात अल्पवयीनाविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास ताब्यात घेण्यात आले व जळगाव बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले त्यास बाल न्यायालयीन कोठडी सुनावणण्यात आली.
शहर बंदला प्रतिसाद
संतापजनक व निंदनीय घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी मुक्ताईनगर तालुका बंदचे आवाहन केले होते. मुक्ताईनगर शहरातील व्यापारी, दुकानदार, व्यावसायीक व समस्त नागरिकांनी शनिवारी शांततेत शंभर टक्के बंदला प्रतिसाद देत संशयीत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.


