पिता-पूत्राला जळगावात मारहाण : विकृताला दारूसाठी पैसे न दिल्याने घटना


जळगाव (16 मार्च 2025) : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाला व त्याच्या वडीलांना बेल्टने मारहाण करण्यात आली तसेच रस्त्यावरील दगड मारून दुखापत केल्याची घटना शनिवार, 15 मार्च रोजी पहाटे 5 वाजता मानराज पार्क येथे घडली. याप्रकरणी दुपारी साडेबारा वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत किरण बाविस्कर (28, रा.गुड्डू राजा नगर, जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संकेत हा 13 मार्च रोजी पहाटे पाच वाजता पुणे ते जळगाव असा प्रवास करून मानराज पार्क येथे ट्रॅव्हल्सने उतरला. त्यावेळी संकेतचे वडील त्याला घेण्यासाठी आले होते. त्यानंतर दोघेजण दुचाकीवरून जात असतांना एक अज्ञात व्यक्तीने दोघांचा रस्ता अडविला आणि दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

पैसे दिले नाही म्हणून संकेत व त्याचे वडील किरण बाविस्कर यांना बेल्टने मारहाण केली तर रस्त्यावर पडलेला दगड मारून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर संकेत बाविस्कर याने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी साडेबारा वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे हे करीत आहे


कॉपी करू नका.