पिंप्राळ्यात दुचाकीवर बसवून नेलेल्या तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण


जळगाव (18 मार्च 2025) : काही तरी बोलायचे आहे, असे सांगत गाडीवर बसवून संशयिंत तरुणाला सोबत घेवुन गेले. पुढे नेत लाकडी दांडक्याने हाता-पायावर मारहाण केली. त्यानंतर एकाने धारदार वस्तुने हात व पोटावर वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. शुक्रवारी ( 14 मार्च) संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना पिंप्राळा हुडकोत देशी दुकानाबाहेर रस्त्यावर घडली.

अजय जिवन पवार (वय 34,रा. खंडेराव नगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात शैलेश संजय सोनवणे, दादु पंढरीनाथ राजपुत, दादुचा मित्र अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सत्यवान वारंगे हे तपास करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !