रिक्षातून प्रवास करताना वयोवृद्धेकडील 35 हजारांची रोकड लंपास
अमळनेर (19 मार्च 2025) : रिक्षातून प्रवास करताना भामट्यांनी महिलेच्या पिशवीतून 35 हजार लांबवले. ही घटना मंगळवार, 18 मार्च रोजी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्पनाबाई भीमराव पाटील (60) या महिला मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बडोदा बँक परिसरातून रिक्षातून प्रवास करत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतून 35 हजार रुपयांची रोकड लांबवली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायंकाळी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तपास हवालदार मिलिंद अशोक सोनार करीत आहेत.





