पैसे परत करण्याच्या वादातून महिलेच्या डोक्यात टाकली लोखंडी सळई


जळगाव (19 मार्च 2025) : शहरातील रामदेववाडी भागातील 50 वर्षीय महिलेच्या डोक्यात पैसे परत करण्याच्या वादातून सळई टाकण्यात आली. याप्रकरणी पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे मिराबाई हंसराज राठोड या महिला वास्तव्यास आहेत. रविवार, 16 रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या गावातील रामलाल राठोड हा त्यांच्या घराजवळ आला. त्याने मीराबाई राठोड यांना सांगितले की, तुझ्या मुलाने माझ्या जावयाकडून पैसे घेतले आहे, ते पैसे परत कर या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. यावेळी रामलाल राठोड याने त्याच्या हातातील लोखंडी सळई मीराबाई यांच्या डोक्यात टाकली तर बबन रामलाल राठोड यानेदेखील त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले.


दरम्यान, महिलेने तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रामलाल राठोड व त्यांचा मुलगा बबन रामलाल राठोड (दोघ रा.रामदेववाडी, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार स्वप्नील पाटील करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !