एरंडोल तालुक्यातील महिलेचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू


Woman from Erandol taluka dies in bee attack जळगाव (20 मार्च 2025) : अचानक मधमाशांनी हल्ला चढविल्याने अनोळखी 80 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली होती. तिला 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान तिची प्रकृती गंभीर झाली. उपचाराला प्रतिसाद देऊ न शकल्याने तिचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदन कक्षात हलविण्यात आला. ओळख पटवून नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार काशिनाथ पाटील हे तपास करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !