जळगाव तालुका खुनाने हादरला : कानसवाड्यातील माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या
जळगाव : कानसवाड, ता.जळगाव येथील माजी उपसरपंचाची किरकोळ वादातून निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. युवराज सोपान कोळी (35, रा.कानसवाडा ता. जळगाव) असे मयताचे नाव आहे.
युवराज सोपान कोळी हा तरुण आपल्या आई, वडील, तीन मुलं, पत्नी यांच्यासह भांडली येथे वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होते. युवराज कोळी याचे गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला होता. या वादातून अज्ञात तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून खून करण्यात आला.

ही भयंकर घटना काही शेतकर्यांच्या समोर घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती, तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. युवराज कोळी यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून आणते मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला होता. मयत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकर्यांनी दिली.




