भुसावळ शहरात तृतीय पंथीयावर ब्लेडने हल्ला : त्रिकूटाविरोधात गुन्हा


भुसावळ (21 मार्च 2025) : शहरातील केला सायडींगजवळ दुचाकीवरून जाणार्‍या तृतीय पंथीयावर जुन्या वादातून एकाने ब्लेड मारून हल्ला केला. ही घटना गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी त्रिकुटाविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार तानिया (29, फुलगाव, भुसावळ) या तृतीयपंथी असून त्यांच्याशी बोलत नसल्याच्या जुन्या वादातून संशयीत रितीक सैंदाणे (भुसावळ) याने पाणी गेटकडे जाणार्‍या चौफुलीवर गुरुवार, 20 मार्च दुपारी दिड वाजता ब्लेडने हल्ला केला. डोक्याला ब्लेड लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. तातडीने सहकार्‍यांनी त्यांना भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. याप्रकरणी शहर पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी ट्रामा सेंटर गाठत तानियाचा जवाब घेतला व संशयीत रितीकसह अन्य दोन अनोळखींविरोधात शहर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सैय्यद करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !