धरणगाव पंचायत समितीच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकार्‍यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

दिड हजारांची लाच भोवली : कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ


Two people including Assistant Program Officer of Dharangaon Panchayat Samiti in the net of ACB धरणगाव (22 मार्च 2025) : गोठा शेडचे कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रवीण दीपक चौधरी (39, म्हसवे, ता.पारोळा) व तांत्रिक सहाय्यक उमेश किशोर पाटील (36, रा.दोंदवाडे, ता.चोपडा) यास शुक्रवारी सायंकाळी जळगाव एसीबीने कार्यालयातच अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

असे आहे लाच प्रकरण
35 वर्षीय तक्रारदार यांना त्यांच्या शेत-शिवारात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गोठा शेड तयार करण्याचा कार्यारंभ आदेश देण्याचे मोबदल्यात आरोपी प्रवीण चौधरी यांनी तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागून दिड हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली तर आरोपी उमेश पाटील याने गोठा शेड बांधकाम करण्याच्या जागेची आखणी करून जागेचे जीपीएस प्रणालीद्वारे फोटो काढण्यासाठी तक्रारदार यांच्या शेतात जाण्याकरिता पेट्रोल पाण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास कोणताही विरोध न दर्शवता मुक संमती दर्शवून तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहित केले. सापळा रचून दोघांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !