कानसवाड्यातील माजी सरपंचांची हत्या एका आरोपीला अटक
One accused arrested in murder of former sarpanch in Kanswada जळगाव (21 मार्च 2025) : जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथे पूर्व वैमनस्यातून शुक्रवारी सकाळी आठ वाजता (शिंदे गट) माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (36) यांची गावातील तिघांनी जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली होती. गुन्हे शाखेने या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.
शिंदे गटाच्या पदाधिकार्याची हत्या
कानसवाडी गावातील तिघांनी आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे (शिंदे गट) माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात चाकू आणि चॉपरने वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कोळी यांचा मृतदेह जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. या वेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

आपल्या कार्यकर्त्याचा खून झाल्याचे कळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन नातेवाईकांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या खुनाच्या प्रकरणामध्ये भरत पाटील याच्यासह त्याच्या मुलांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
एका आरोपीला अटक
आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाल्यानंतर भरत पाटील यास ताब्यात घेण्यात आले असून दोन संशयीत अद्याप पसार पसार आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन्ही संशयितांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल.




