जळगाव जिल्ह्यात लाचखोर हादरले : दुसर्‍या दिवशी पुन्हा खर्दे बु.॥ ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


Kharde B.॥ Rural Development Officer in the net of ACB जळगाव (22 मार्च 2025) : धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धरणगाव तालुक्यातील खर्दे बु.॥ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (37) यास जळगाव एसीबीने शनिवारी दुपारी अटक केली. सलग दुसर्‍या दिवशी धरणगाव तालुक्यात लाचखोराला पकडण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणेत पुरती खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
35 वर्षीय तक्रारदाराने 22 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी खर्दे गावात गटारीचे दोन लाखांचे व गावहाळ बांधण्याचे 70 हजारांचे मिळून दोन लाख 70 हजारांचे काम केले होते. ग्रामविकास अधिकारी ब्राह्मणे यांनी दोन्ही कामाचे बिल काढून दिल्यानंतर दोन लाख 64 हजार तक्रारदाराच्या खात्यात जमा झाले मात्र बिले काढून दिल्याच्या मोबदल्यात 10 टक्क्यांप्रमाणे 25 हजारांची लाच मागणी करण्यात आल्याने एसीबीकडे तक्रार देण्यात आली व शनिवारी दुपारी लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केला सापळा
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, किशोर महाजन, अमोल सुर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !