अर्धांग वायूचा झटका : यावलच्या बस चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अंजाळे बसस्थानकावरील घटना : मयत चालक यावलचा रहिवासी


यावल (22 मार्च 2025) : यावल एस.टी.आगारातून भुसावळ येथे बस घेऊन जात असतांना यावल येथील रहिवासी 58 वर्षीय बस चालकाला अंजाळे गावाच्या बस स्थानकाजवळ अचानक अर्धांग वायूचा झटका आला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने उपचाराकरिता भुसावळ व नंतर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. बुधवारी रुग्णालयात उपचारादरम्यान बस चालकाचा मृत्यू झाला. चालकाच्या अकाली मृत्यूमुळे यावल शहरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

कर्तव्यावर आला अर्धांग वायूचा झटका
यावल एस.टी. आगारातील बस चालक शालिक वसंत पाटील-बारी (58, रा. जुना भाजी बाजार, बारी वाडा, यावल) हे यावल एस.टी. आगारातून बस घेऊन भुसावळ जात असताना अंजाळेजवळ त्यांना अर्धांग वायूचा झटका आला. प्रसंगावधान राखत त्यांनी बस थांबवली. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने नागरिकांनी त्यांना तेथून भुसावळ व नंतर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, नातू असा परिवार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !