चिंचोली येथील शेत विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला
यावल (23 मार्च 2025) : यावल तालुक्यातील चिंचोली येथील एका शेत विहिरीत अनोळखी 35 वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.
काय घडले नेमके
चिंचोली, ता.यावल या गावातील शेत-शिवारामध्ये दिनेश काशीनाथ सपकाळे यांच्या शेत गट क्रमांक 353 च्या शेत विहिरीतून दुर्गंधी येत होती. याची माहिती शेतमजुरांनी पोलीस पाटील राकेश साठे यांना दिली. त्यांनी विहिरीत जाऊन डोकावून पाहिले असता विहिरीत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. ावल पोलिसांना याबाबत माहिती देऊन मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे. मयत तरूणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.





