नराधम पित्याचा मुलीवरच अत्याचार


उमदी (23 मार्च 2025) : बाप-बेटीच्या पवित्र नात्याला पित्यानेच कलंक लावल्याचा प्रकार जत तालुक्यातील पूर्वभागातील एका गावात समोर आला. नराधम बापानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगताच दोघींनी उमदी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

तालुक्यातील पूर्वभागातील एका गावातील हा बाप काही दिवसांपासून 13 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करत होता. घाबरून मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. अखेर शुक्रवारी तिने आईला हा प्रकार सांगताच तिला धक्का बसला.


तिने पीडित मुलीला घेऊन उमदी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून नराधम बापावर गुन्हा दाखल केला. ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर तत्काळ त्याला अटक करण्यात आली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !