भुसावळ तालुका पुन्हा खुनाने हादरला : सुसरी शिवारात वीटभट्टीवरील मजूर महिलेचा पतीकडून खून


भुसावळ (23 मार्च 2025)  : भुसावळ शहरात दोन दिवसांपूर्वी हद्दपार गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना घडल्यानंतर आता भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात वीट भट्टीवरील मजूर महिलेचा पतीनेच गळा आवळून खून केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके
वरणगाव परिसरातील सुसरी शिवारातील वीट भट्टीवर आजीस सलीम शेख (35) व त्याची पत्नी सना आजीस शेख (25, बीड, जि.परळी, वैजनाथ) हे दाम्पत्य दोन वर्षांपासून कामाला आले होते.


शनिवारी रात्री दाम्पत्यात कुठल्यातरी कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपी आजीस शेखने पत्नी सना शेखचा गळा आवळून खून केला. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर वरणगाव परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन खंडेराव व सहकार्‍यांनी धाव घेतली.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !