25 हजारांची लाच घेणार्या खर्दे बु.॥ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकार्याला पोलीस कोठडीची हवा
Kharde B. who took a bribe of 25 thousand. Gram Panchayat’s rural development officer wants police custody जळगाव (23 मार्च 2025) : धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धरणगाव तालुक्यातील खर्दे बु.॥ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (37) यास जळगाव एसीबीने शनिवारी दुपारी अटक केली होती. संशयीताला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
35 वर्षीय तक्रारदाराने 22 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी खर्दे गावात गटारीचे दोन लाखांचे व गावहाळ बांधण्याचे 70 हजारांचे मिळून दोन लाख 70 हजारांचे काम केले होते. ग्रामविकास अधिकारी ब्राह्मणे यांनी दोन्ही कामाचे बिल काढून दिल्यानंतर दोन लाख 64 हजार तक्रारदाराच्या खात्यात जमा झाले मात्र बिले काढून दिल्याच्या मोबदल्यात 10 टक्क्यांप्रमाणे 25 हजारांची लाच मागणी करण्यात आल्याने एसीबीकडे तक्रार देण्यात आली व शनिवारी दुपारी लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकेतील आरोपी ब्राह्मणे यास रविवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकारी करीत आहेत.




