जळगावात ब्रेक फेल ट्रकने घेतला रिक्षा चालकाचा बळी


जळगाव (23 मार्च 2025) : शहरातील छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावर शनिवार, 22 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावरून जात असलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने रिव्हर्स आलेल्या ट्रकने पुलाजवळ उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले तर रिक्षा चालक सुरेश रुपचंद जैस्वाल (55, राधाकृष्ण नगर, जळगाव) हे जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

काय घडले जळगावात
सुरत रेल्वे गेटजवळ असलेल्या माल धक्क्यावरून सिमेंट भरून (एम.एच.19 सी.वाय.7745) क्रमांकाचा ट्रक शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात होता. पुलावर काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि ट्रक उतारावरून मागच्या बाजूने रिव्हर्स येऊ लागला. पूर्णपणे भरलेला ट्रक भरधाव वेगाने रिव्हर्स येत असल्याने त्याने तीन रिक्षा आणि चार ते पाच दुचाकींना चिरडले. यात राधाकृष्ण नगरातील रहिवासी आणि रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल हे गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.


  • राधाकृष्ण नगरातील रहिवासी सुरेश रुपचंद जैस्वाल हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !