कानसवाडा येथे माजी सरपंचाची हत्या : तिसर्‍या आरोपीलाही बेड्या


Murder of former sarpanch in Kanaswada : Third accused also arrested नशिराबाद (25 मार्च 2025) : जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथे पूर्व वैमनस्यातून शुक्रवारी सकाळी आठ वाजता (शिंदे गट) माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (36) यांची गावातील तिघांनी जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली होती. या गुन्ह्यात प्रमुख संशयीताला अटक करण्यात आल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी दुसरा संशयीत परेश उर्फ सोनू भरत पाटील यास अटक केली तर रविवारी या गुन्ह्यातील तिसरा संशयित यास अटक करण्यात आली. भरत भास्कर पाटील (शेळगाव, ता.जि. जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

शिंदे गटाच्या पदाधिकार्याची हत्या
कानसवाडी गावातील तिघांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवसेनेचे (शिंदे गट) माजी उपसरपंच युवराज कोळी यांची ग्रामपंचायतीच्या जुन्या वादातून चाकू व चॉपरचे वार करीत हत्या केली होती. ही घटना कानसवाडा शिवारातील शेत गट क्रमांक 135 मध्ये घडली होती. खुनानंतर संशयीत पसार झाले होते.


यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी.मनोरे, सहा.फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव, शिवदास चौधरी व सागर बिडे आदींच्या पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !