बँकेत आलेल्या वृद्धेच्या पिशवीतून 85 हजार लांबवले : मुक्ताईनगरातील घटना
85 thousand stolen from the bag of an elderly woman who came to the bank : Incident in Muktainagar मुक्ताईनगर (25 मार्च 2025) : बँकेत कामानिमित्त आलेल्या वृद्ध महिलेच्या पिशवीला ब्लेड मारत चोरट्यांनी चोरट्यांनी 85 हजारांची रोकड लांबवली. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजता घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बेबाबाई प्रभाकर काळे (62, रा.हरताळा, ता.मुक्ताईनगर) या वृद्ध महिला सोमवारी दुपारी एक वाजता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीतील 85 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पिशवीला ब्लेड मारत लांबवली. चोरीचा उलगडा झाल्यानंतर वृद्ध महिलेने बँकेसह परिसरात शोध घेतला मात्र कुठलीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीला सुरूवात केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे करत आहेत.





