भुसावळात महिला कर्मचार्‍याचा विनयभंग करीत सोशल मिडीयावर बदनामी


भुसावळ (25 मार्च 2025) : शहरातील रहिवासी व रेल्वेत नोकरीला असलेल्या 35 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिची सोशल मिडीयावर बदनामी करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एका विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण
35 वर्षीय विवाहिता ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एका भागात वास्तव्यास असून रेल्वेत नोकरीला आहे. संशयीत अब्दुल रहिम शेख (27, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ) याने 1 मार्च रोजी दुपारी साडेतीन ते 15 मार्च व 17 मार्च रोजी सकाळी साडेसहा दरम्यान विवाहितेचा पाठलाग केला व माझ्याशी संबंध ठेव म्हणत गळ घातली तसे न केल्यास फोटो व्हायरलची धमकी देत पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने अंगावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी दिली तसेच मुलासह पतीला ठार मारण्याची धमकी दिली.


या प्रकारानंतर संशयीताने महिलेसह तिच्या मित्राचे फेसबुकवर फोटो टाकून बदनामी केल्याने पीडीतेने शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यावरून आरोपी अब्दुल रहिम शेख (27, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !